ऑनलाईन पीएफ कसा काढायचा | How withdrawal PF Online

मित्रांनो या पोस्टचा शिर्षक तुम्ही वाचलाच असेल !  या पोस्टमध्ये मी ऑनलाईन पद्धतीने पीएफ कसा काढायचा ते सांगणार आहे.
     पैसे काढण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • तुमची केवायसी पुर्ण असणे (kyc कशी करावी हे खाली दिले आहे)
  • Date of joining आणि date of exit अपडेट असावं
  • मोबाईल नंबर आधार सोबत लिंक असावं
  • नोकरी सोडल्यास ६० दिवस पुर्ण असावे


ईपीएफ [कर्मचारी भविष्य निर्वाह निधी] ही एक सरकारी योजना आहे जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय द्वारे व्यवस्थापित केली जाते.यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून १२% बारा टक्के व तेवढीच रककम त्याच्या रुजू असलेल्या कंपनीतून त्याच्या निधी खात्यामध्ये दर महिन्याला जमा होते. ही सर्व रक्कम कर्मचाऱ्याला सेवानिृत्तीनंतर मिळते.

आगाऊ रक्कम:-
                       काही कारणास्तव तुम्हाला पैशाची गरज आहे जसे घर खरदी/घर बांधकाम/कर्जाची थकबाकी/दवाखाना उपचार/स्वतः च लग्न  [ Source Conditions ]
        अशा वेळी कर्मचारी त्याच्या निधी खात्यातून काही प्रमाणात रक्कम आगाऊ काढू शकतो, पण त्यासाठी काही मर्यादा आहेत जसे तुम्हाला वरील काही कारणांसाठी ५ ते १० वर्ष कामावर असण्याची गरज आहे

कधी पैसे काढू शकता ?
               जर तुम्ही तुमचा काम सोडला आहे आणि तुम्ही ६० दिवसांपेक्षा जास्त वेळ बेरोजगार आहात तर अशावेळी तुम्ही तुमचे सर्व पैसे काढू शकता.

ऑनलाईन पैसे काढण्यासाठी कशाची गरज भासते ?
         १) सार्वत्रिक खाता क्रमांक [UAN number]  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी [EPFO] संस्थेने सर्व खातेदारांना एक युअन [UAN] क्रमांक दिला असतो. हा क्रमांक तुमच्या पीएफ खात्याला जोडलेला असतो. जर तुमच्याकडे युआन क्रमांक नसेल तरी घाबरु नका कारण तुम्ही तुमचा नवीन युआन क्रमांक ऑनलाईन तयार करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे पीएफ खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक जो तुमच्या कंपनी कडे रजिस्टर असेल.

          २) [KYC] युएन ची जोडणी आधार , पॅन कार्ड व
तुमच्या बँक खात्याशी असणे गरजेचे आहे.

कशी कराल जोडणी ?
     सर्वात पहिले या लिंकवर क्लिक EPF member Login करा, याने पीएफ पोर्टल ओपन होईल. तुमचा युएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.लॉगिन झाल्यानंतर मॅनेज ट्याबला क्लिक करा आणि KYC ला निवडा. KYC चे पर्याय उघडतील, एकावेळी एकच डिटेल भरा व सेव करा. असं करून पॅन, आधार व बँक ची माहिती भरा. ३ ते ४ दिवसात तुमची माहिती सत्यापित [verify] होईल.
 
ऑनलाईन पैसे कसे काढाल ?
       जर तुमचा युएन व केवायसी पूर्ण असेल, तर तुम्ही ऑनलाईन पैसे काढण्यासाठी विनंती करू शकता. त्यासाठी सर्वात पहिले ईपीएफ EPF Portal पोर्टल वर लॉग ऑन करा. तुमचा युएन आणि पासवर्ड प्रविष्ट करा. त्यानंतर ऑनलाईन टॅब वर क्लिक करा व क्लेम पर्याय निवडा. ऑनलाईन क्लेम उघडेल त्याच्यामध्ये तुमचा बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून खात्री करा. आणि पुढील पर्याय ऑनलाईन क्लेम निवडा. जो फॉर्म भरायचा आहे तो निवडा उदा: फॉर्म १९ व फॉर्म १०C
   # फॉर्म क्रमांक १९ ने फक्त तुमच्या वेतनातून जे पैसे जमा होयचे ते काढता येतील
   # फॉर्म क्रमांक १०क ने जे पैसे तुमच्या कंपनी कडून तुमच्या खात्यात जमा होतात ते काढता येणार.
     टीप - १ ) दोन्ही हवे असल्यास दोन्ही फॉर्म एका पाठोपाठ भरून टाका .
              २ ) लक्षात असू द्या की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमची कामावर रुजू असलेली व काम सोडलेली दिनांक अपडेट असणे आवश्यक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या