गुगल क्रोम करणार तुमचे फसव्या साईटपासून रक्षण होय तुम्ही अचुक वाचलं आहे. गुगल क्रोम च्या वर्जन ७५ (version 75) मध्ये हा नवीन फीचर्स संपादित करण्यात आला आहे. ज्याने काय होईल की ज्या फसव्या साईट असतात त्या साईटला तुम्ही चुकुन भेट दिलीत तर क्रोम ७५ तुम्हाला सुचना करेल की तुम्ही फसव्या साईटवर आहात. म्हणजेच क्रोम तुमचे अशा साईट पासून रक्षण करेल. काही साईट ओरीजनल साईटची हुबेहूब नक्कल करतात त्यामुळे आपल्याला ती साईट खरी आहे का खोटी हे सहज लक्षात येत नाही. अशा वेळी हा फिचर्स खूप महत्त्वाचा ठरू शकतो. एक गोष्ट लक्षात असुद्या फेक साईटवर तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरलात तर तुमचा अकाउंट हॅक होऊ शकतो.

हा फिचर्स तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी क्रोम ब्राऊझर अपडेट करा. वर्जन ७५.
आणि तुम्ही अशा फेक साईटचा गुगल कडे रीपोर्ट करु शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या