मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांना मंडपासाठी परवानगी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे

 
२०१९ या वर्षी गणपती बाप्पाचे २ सप्टेंबर ला आगमन होणार आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गणपती मंडळांना मंडपासाठी मुंबई महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे.
म्हणूनच मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांना मंडपासाठी परवानगी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.
   
     ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम एमजीएम पोर्टल ला भेट द्या. MCGM Portal
पोर्टल ला भेट देण्याआधी खालील गोष्टी जवळ ठेवा.

  1.  अर्जदाराचे नाव, ई-मेल, मोबाईल नंबर,आधार नंबर
  2.  मंडळाचे सचिवांचे नाव, ई-मेल, मोबाईल नंबर, आधार नंबर
  3. अध्यक्षांचे नाव, ई-मेल, मोबाईल नंबर, आधार नंबर
  4.  मंडळाची संपूर्ण माहिती उदा: नाव, पिनकोड सहीत पत्ता, प्रशासकीय विभाग क्र.(A ward,B ward), क्षेत्रफळ (लांबी*रुंदी*उंची), प्रवेशद्वार क्षेत्रफळ, ठीकाणाचे रेखाटन (location sketch + photograph), 

तुम्हाला कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत मंडप हवा आहे ती दिनांक.

  • आवश्यक स्कॅन कागदपत्रे
  1. अग्नी सुरक्षा अनुपालनाचे हमीपत्र/क्षतीपुर्तीबंधपत्र
  2. महानगरपालिकेचा जुना गणपती मंडप परवाना (जुना असल्यास)
  3. ठीकाणाचे रेखाटन+ छायाचित्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या