मराठी भाषेसाठी आझाद मैदानात आंदोलन


मराठी भाषेसाठी आझाद मैदानात आंदोलन

आज 24 जुन 2019,
     मराठी भाषा प्रसार, प्रचार. संवर्धनासाठी सक्षमीकरण, मराठी शाळांसंबंधीच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील 24 संस्था एकत्र येऊन, मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. मराठी भाषेतील अनेक साहित्यिक, शिक्षक, विचारवंत एकत्र येऊन मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु केलं आहे

ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षक प्राध्यापक हरी नरके, साहित्यिक, डॉ नागनाथ कोतापल्ले,डॉ मधू मंगेश कर्णिक, डॉ कौतिकराव ढाले पाटील, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, दादा गोरे, मिलिंद जोशी,दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ. दीपक पवार अध्यक्ष मराठी साहित्य परिषद, यांच्यासह मराठी भाषाप्रेमी इत्यादींनी या आंदोलनात भाग घेतला.


महाराष्ट्रातील 24 संस्था एकत्र येऊन, मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे.


     प्रमुख मागण्या

  • मराठी शाळांचं सक्षमीकरण
  • मराठी शाळातील शिक्षकांना वेतनेतर अनुदान देणे
  • मराठी शाळांची शिक्षक भरती तातडीने करणे
  • राज्य सरकारच्या 2012 च्या निरधारानुसार नुसार ग्रामीण भागात जिथे मराठी शाळांची गरज आहे, अशा 259 शाळांचा प्रस्ताव अंतिम टप्यात रद्द झाल्याने अशा ठिकाणी या शाळा नव्याने सुरु करणे
  • सर्व बोर्डात 1 ते 12 इयत्तासाठी मराठी भाषा अनिवार्य करणे

माझ वैयक्तिक मत =

खरं तर आपल्याच राज्यात आपल्या राज्यभाषेसाठी आंदोलन करण्याची वेळ आली यासारखी दुदैवी गोष्ट ती काय असावी. सर्वांनी मिळून, राजकारण बाजूला ठेवून आपल्या मातृभाषेसाठी एकत्र आले पाहिजे. पण अस काही होत नाही, राजकारणी आपल्या मातृभाषेचा सुद्धा राजकारण करत आहेत. आम्ही आश्वासन देतो,आम्ही विचार करतो असे चालु आहे. यासाठी सामन्य मराठी मानसाने आंदोलनात पुढाकार घेतला पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या