ॲंडराॅईड रुट म्हणजे काय ? | What is root in Android ? In Marathi..
मित्रांनो, जर तुम्ही ॲंडराॅईड वापरकर्ता म्हणून नविन असाल तर तुम्ही नक्कीच फोन रुट करणे याबाबत ऐकलं असेल. तर नक्की काय भानगड आहे ही ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
      रुट म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अनुमती (permission) असते. जर तुम्ही फोन रूट केलात , तर या अनुमतीच्या मदतीने तुम्ही फोन मधील ओएस (OS) लेवल पर्यंत बदल घडवू शकता.ॲंडराॅईड ही लिनक्स (linux) आधारित कार्यकारी प्रणाली (Operating_System) आहे. लिनक्स मध्ये रूट अनुमती ही विंडोज च्या ॲडमिन अनुरुप असते. लिनक्स मध्ये रुट असतं त्याचप्रमाणे ॲंडराॅईड मध्येही असतो पण तो निर्माता कंपनी कडून बंद केलेला असतो. जर तुम्ही फोन रूट केलात तर तुमच्या फोनची वॉरंटी त्याक्षणी काळबाह्य होते. म्हणून रुट करताना चार वेळा विचार करावा.
    # रुट चा वापर करून तुम्ही फोन मधले प्रिईनस्टॉल ॲप डीलिट करु शकता.

    # नविन फॉंट ईंनस्टॉल करु शकता.

    # थिम ईंनस्टॉल करु शकता.

    # कोणताही ॲप सिस्टेम ॲप करु शकता.

    # कोणताही ॲप डीलिट करु शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या