"गुगल पे" चा नवा लूक | Google Pay new look in India

Image credit: Google

भारतामध्ये गुगल पे ला नविन अपडेट आलं आहे. गुगल चा upi आधारित ऑनलाईन पेयमेंट ॲपला मटेरियल डिझाईनचा अपडेट आलं आहे. भारतीय वर्जनचा गुगल पे (जुनं नाव 'गुगल तेज') आता नवीन लुक मध्ये दिसणार आहे. गुगल च्या बाकी ॲप'चा लुकला जुळवून घेईल असे हे बदल करण्यात आले आहेत. नवा लूक एकदम साफ-सोपा व युजर फ्रेंडली करण्यात आली आहे. नवीन लुक मध्ये निअरबाय पर्याय वगळण्यात आलं असून वरती ॲपच्या होमस्क्रीनवरील  UPI id लपवण्यात आलं आहे. आता ॲपच्या टॉपला सर्वात वरती उजव्या बाजूला प्रोफाइल फोटो व डाव्या बाजूला QR स्कॅनर चा पर्याय मिळेल, जो आधी दोन-तीन क्लिक/टच दुर होता.

     नवीन लुक मध्ये तीन टॅब पहायला मिळतील business/व्यवसाय, bill/बिल, आणि transfer/ट्रांन्सफर. जुन्या लुक मध्ये हे सर्व पर्याय एकत्र असल्याने गोंधळ होण्याचा संभव जास्त होता. प्रोफाइल सेक्शन मध्ये बदल करून युजरची वैयक्तिक माहिती, QR code, जिंकलेले कुपन आता एकत्र दिसतील. हे सर्व बदल सर्व्हर साईड आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा गुगल पे ॲप अपडेट ठेवा. येणार्या दिवसांत तुम्हाला हा नवा लूक पहायला मिळेल.
Image credit: Xda Developer

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या