गुगल व्होईस टायपिंग कशी ॲक्टीवेट करायची | How to Activate Google Voice Typing in Marathi

गुगल व्होईस टायपिंग कशी ॲक्टीवेट करायची  |  How to Activate Google Voice Typing in Marathi

या ट्युटोरियल मध्ये आपण जाणून घेणार आहोत की, गुगल व्होईस टायपिंग कशी ॲक्टीवेट करायची आहे. आणि ती पण मराठी मध्ये, हो मराठीतच. म्हणजे मोबाईल युजरने फक्त माइक बटन दाबायचा आणि तुमचा मेसेज बोलायला सुरुवात करायची. तुमचं आवाज ऐकून मोबाईल स्वत:हून टायपिंग करण्यास सुरुवात करेल. यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये गुगल ॲप आणि फोनची सेटिंग्ज मध्ये थोडासा बदल करावा लागेल. (टीप: १- व्होइस टायपिंग साठी इंटरनेट सेवा चालू असायला हवी. २- गुगल ॲप अपडेट असावं/नसेल तर आताच इंन्स्टाॅल करा.)
     फोटो क्र. १ मध्ये दिल्या प्रमाणे सर्वप्रथम गुगल ॲप ओपन करा आणि गुगल ॲप च्या सेटिंग्ज मध्ये जा. सेटिंग्ज मध्ये व्होइस पर्याय निवडा आणि नंतर भाषा (language) पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा म्हणजेच मराठी निवडा. (फोटो क्र. २) आता गुगल ॲप मधुन बाहेर या आणि फोनची मेन/मुख्य सेटिंग्ज ओपन करा. (फोटो क्र.३) इनपुट आणि भाषा पर्याय निवडा. त्यानंतर व्हरचुअल किबोर्ड (virtual keyboard). मॅनेज किबोर्ड वर क्लिक करून गुगल व्होईस टायपिंग ॲक्टीवेट करा (टिप: ॲक्टीवेट नसेल तर 🤣)
     लक्षात ठेवा किबोर्ड मध्ये टायपिंग करण्यासाठी जी भाषा ॲक्टीवेट असेल तीच भाषा माइक बटन दाबल्यानंतर व्होइसने टाइप होईल.
     आता किबोर्ड ओपन करा आणि माइक बटन दाबून बोलायला सुरुवात करा.

फोटो क्र. १

फोटो क्र. २

फोटो क्र. ३


फोटो क्र. ४

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या