कोणता सिम कार्ड वापराल ? Which sim card/operators you choose after telecom operators hike data plans price ?

डिसेंबर १०/२०१९

कोणता सिम कार्ड वापराल ?

Jio-idea-airtel-vodafone
  •  ठळक मुद्दे
  •  सर्व ऑपरेटरांनी किंमतीत वाढ केली
  •  तुम्ही कोणता वापराल ?
  •  काही युक्त्या/
मित्रांनो तुम्ही पाहिलच असेल की डिसेंबर महिन्या पासून जिओ, एअरटेल, आयडिया आदी कंपन्यांनी त्यांचे प्लान ची किंमत ४०% ने वाढवली आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता ऑपरेटर सर्वात स्वस्त आहे ? कोणता सिम कार्ड वापरायला हवा ? किंवा चालू सिमकार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून घ्यावा का ? या पोस्टमध्ये मी याबद्दल थोडी माहिती सामायिक करणार आहे.
      सर्वात पहिले जाणून घ्या कि कोणता ऑपरेटर सर्वात स्वस्त आहे. खालील स्क्रीनशाॅट मध्ये पहा. 
1airtel, 2 jio , 3 idea compare

दररोज १.५ जिबी/२८दिवस
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे २८ दिवस वैधता असलेलं व सोबत दररोज १.५जिबी मिळणार रिचार्ज आता जिओकडून १९९₹ ला तर एअरटेल आयडिया कडून २४९रूपयांना मिळेल. जो पहीले १५० रूपयांपासून सुरू होयाचा.

दररोज १.५ जिबी/८४दिवस
८४ दिवस वैधता असलेल्या प्लानची किंमत ३९९ रूपयांवरून अनुक्रमे जिओ ५५५₹, एअरटेल ५९८₹, आयडिया ५९९₹ करण्यात आली आहे. हे सर्व पर्याय बघता जिओ ५० रूपये कमी आकारत आहे.
    तुम्हाला कोणता ऑपरेटर ची सेवा वापरायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय. पण माझं वैयक्तिक मत मी पुढे तीन मुद्द्यांवर  सांगतो.
१ : नेटवर्कची उपलब्धता - तुम्ही जिथे फोन वापरता तिथे इतर ऑपरेटर सोडून फक्त तुमच्या दररोजच्या ऑपरेटरला चांगला नेटवर्क मिळत असेल, तर अशा वेळी तुमच्याकडे तोच एकमेव पर्याय असेल.

२ : डेटाचा वापर - जर तुम्ही मोबाईल इंटरनेटचा फक्त व्हॉट्स ॲप' व ब्राउजिंग पुरता वापर करत असाल तर याचा अर्थ असा की तुमचा इंटरनेट डेटा वापर कमी आहे व यासाठी तुम्हाला एअरटेलचा ४८ रूपयांचा प्लान चांगला आहे. ४८ रूपये मध्ये ३ जिबी इंटरनेट डेटा २८ दिवसांसाठी मिळतो.
      जर तुम्ही युट्युब विडिओ/मुवी स्ट्रिमिंग करता तर अशावेळी तुमच्याकडे जिओ हा पर्याय चांगला आहे.

३ : जर तुम्हाला सिम कार्ड ओटिपी आणि येणाऱ्या कॉल्स पुरता चालू ठेवायचा असेल तर एअरटेल मध्ये २३ रूपयांचा पर्याय आहे. २३ रूपयात २८ दिवस सिम कार्ड ॲक्टीवेट राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या