हुवाईची आर्म आधारित cpu चीप लवकरच डेस्कटॉप कंप्युटर साठी उपलब्ध होणार


  • हुवाई D920S10
  • हुवाई कीरीन 920 सिपीयू

Huawei 980 7nm cpu

हुवाईचा आर्म आधारित cpu चीप लवकरच डेस्कटॉप कंप्युटर साठी उपलब्ध होणार ?
     काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टने त्यांचा मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो एक्स हा आर्म आधारित नविन लॅपटॉप कॉल्कॉम चीप सोबत असणार आहे जाहीर केले होते. तेव्हा पासून आपण असे अनेक आर्म चीप आधारित विंडोज डिव्हाईसेस पाहत आलो. आतापर्यंत फक्त कॉल्कॉम हा आर्म चीप विंडोज साठी उपलब्ध करून देत होता. पण हुवाई सुध्दा लवकरच आर्म आधारित चीप बाजारात उपलब्ध करून देईल असे वाटत आहे.
     कारण, हुवाईने अलीकडे त्यांच्या नविन मदर डेस्कटॉप मदर बोर्ड D920S10 चा परिचय करून दिला आहे. या मदर बोर्ड मध्ये आपल्याला हुवाईची कीरीन 920 प्रोसेसर चीप वापरता येईल. म्हणजेच, कीरीन 920 ने डेस्कटॉप कंप्युटर चालू शकेल. याचाच अर्थ असा होतो की लवकरच आपल्याला हुवाईचा आर्म आधारित डेस्कटॉप कंप्युटर पहायला मिळेल.
     Huawei 920 cpu : हुवाईची 920 चीप ही 7nm ARMv8 वर आधारित असून तीचा जास्तीत जास्त वेग हा 2.6GHZ इतका होऊ शकतो. 920 चीप ही चार कोअर व आठ कोअर अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
     D920S10 Motherboard : हुवाईची D920S10 मदर बोर्ड ही 64GB पर्यंत DDR2400 रॅम ला सपोर्ट करते. बोर्डला हार्ड ड्राइव्ह साठी सहा SATA 3.0 चे व दोन M.2 प्रकारचे पर्यया SSD साठी दिले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या