पोरी तुझा छंद लागला | Pori Tujha Chhand Lagala lyrics


Song Lyrics:
होशील का गं माझी दिवानी,
तुझ्या विना राणी माझी अधुरी कहानी,

हरवतो मी तुझ्यात सुचेना गं काही,
मरतो किती मी तुझ्यावर तुला ठाव नाही,

माझ्या वेड्या मनाला
तुझे वेड लागले गं,

बनुनी पाखरू कसे
उडू लागले गं

छंद लागला, गं पोरी तुझा छंद लागला हो ||२||

इश्क - विश्क काय असते मला काही उमजे ना,
तुच तु मला गं दिसते, बाकी काही दिसते ना,

गोड-गोड चेहरा तुझा
वेडा मला करतो ना,

दिल हा तुला बघण्यासाठी
गल्लोगल्ली फीरतो ना,

कशी गं अशी तु कशी लाजते
मिठीत असावी असे वाटते

स्पर्श तुझा गं मला छेडतो
ही धडकन माझी वाढते

आता प्रेम काय असते
मला कळूं लागले गं

तुझ्या विना काळीज बग ना
जळू लागले गं

Shayari:-

आज आपलं नातं तुटणार की जुळणार माहित नाही
पण मी ऐकलंय.....

प्रेमाने जग जिंकलं जात,
मी तर तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो,
आणि मला ह्या जगाला नाही,
तुला जिंकायचे आहे

Female voice:-

कळाले मला रे वेदना दिलाची,
ओढ लागली रे मला तुझ्या भावनांची,

दिवाना तु होशील माझा मी तुझी दिवानी,
राजा तु होशील माझा मी तुझीच राणी

माझ्या वेड्या मनाला तुझे वेड लागले गं,
बनुनी पाखरू कसे उडू लागले गं,


छंद लागला, गं पोरी तुझा छंद लागला हो ||२||


 Credits:-

♫Song: Pori Tujha Chhand Lagala
♫Singer: Sanju Rathod & Sonali Sonwane
♫Lyrics: Sanju Rathod
♫Composer: Sanju Rathod & Anamika Mehra
♫Music: Rohit Patil
♫Music Programme,Arranged And
Produced By Rohit Patil  https://www.instagram.com/rohitmuzik/
♫Programme By: Uday Suryawanshi,Rupesh Mehra
♫Additional Programming: Abhi Gadwe
♫Song Recorded By :Amey Londhe @Audio Garage Studio, Mumbai
♫Mix & Mastered By : Rohit Patil
♫Music Label: Sanju Rathod SR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या