चल जाऊ समिंदरा गीत | Chal Jau Samindara Lyrics


चल जाऊ समिंदरा...

गायक - 

सागर किनारी
एक गाव लय भारी...
प्रेमाची हाय तिथं
दुनिया न्यारी
जिथं झोंबतो या गार वारा...
चल जाऊ समिंदरा........
गं पोरी चल जाऊ समिंदरा.।।धृ।।

कोळी टाकतात जाळं जिथं
लाटा असतात खट्याळ तिथं
सांज असते हौशी जिथं
रात असते चांदणी तिथं
  असा बेभान जीव हा सारा
  हादरूदे जरासा काळीजकिनारा
    तोरा गुलाबी नशेचा न्यारा...
    चल जाऊ समिंदरा......
गं पोरी चल जाऊ समिंदरा.।।१।।

करू झिम्माड चिम्बाड अंग
खेळू मऊ मऊ रेती संग
उडू आभाळी पाखरांवानी
चल उधळू प्रेमाचे रंग
     तुझ्या केसांत माळून गजरा
     जरा चुकवून लोकांच्या नजरा
     खोलू इश्काचा पिंजरा...
     चल जाऊ समिंदरा....... 
गं पोरी चल जाऊ समिंदरा.।।२।।

गायिका - 

सागर किनारी
एक गाव लय भारी
प्रेमाची हाय तिथं
दुनिया न्यारी
जिथं झोंबतोया गार वारा...
चल जाऊ समिंदरा...
रं पोरा चल जाऊ समिंदरा......

गीतकार - डॉ. सखाराम डाखोरेCredits :
चल जाऊ समिंदरा
Singer : Animesh Thakur ; Sakshi Chohan
Lyrics : Dr. Sakharam Dakhore
Music Composer : Animesh Thakur
Music Produced By : Animesh Thakur
Mix & Master : Shatrughan Mandal(Raju)
Trinity Studio Mumbai
Artist : Abhijit Thakur, Kalyani Vyanktesh


#ChalJauSamindara #MarathiSongs2019 #Koligeet

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या