चिंब भिजलेले, रूप सजलेले गीत | chimb bhijlele rup sajlele lyrics
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रितीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे ।।धृ।।

ओढ जागे राजसा रे अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघ आले
लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रितीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे ।।१।।

हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्नाचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेड हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रितीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे ।।२।।


Credits:
गीत:- चिंब भिजलेले
चित्रपट:- बंध प्रेमाचे २००७
Song:- Chimb Bhijalele
Movie:- Bandh Reshamache - 2007
Singer:- Shankar Mahadevan, Priti Kamat Music Director:- Ajay - Atul

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या