दिस चार झाले मन गीत | dis char jhale mann


दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि
पानपान आर्त आणि झाड बावरून
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन ।।धृ।।

सांजवेळी जेव्हा येई आठव-आठव
हो, सांजवेळी जेव्हा येई आठव-आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन ।।१।।

नकळत आठवणी जसे विसरले
नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन ।।२।।

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
हो, झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि
पानपान आर्त आणि झाड बावरून
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
दिस चार झाले मन, पाखरू होऊन ।।३।।
Credits:
दिस चार झाले मन 
चित्रपट : आईशप्पथ 
गायक :  साधना सरगम 
संगीत  :  अशोक पत्की 
गीत :  सौमित्र

Song: Dis Chaar Jhale
Artist: Sadhana Sargam
Album: Aaishapath
Licensed: Sagarikamusic


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या