Gudi Padwa info in Marathi | गुढीपाडवा

मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा हिंदु दिनदर्शिकेचा पहिला दिवस असतो.  श्रीरामांनी रावनाचा वध करून ते अयोध्येत परत आले तोच हा विजय दिवस. या वर्षी 25 मार्च 2020 ला गुढीपाडवा असून शके 1942 या शालिवाहन वर्षाची सुरुवात होईल.


  या वर्षांना शके का म्हणतात ?
     याची सुरुवात इसवी सन 78 मध्ये झाली जेव्हा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव केला. गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा शालिवाहन कुळातील होता. या विजयापासून शालिवाहन कुळाच्या नावाने शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली. प्रत्येक शालिवाहन शकाला विशेष नाव असतो. या गुढीपाडव्याला सुरू होणार्या शकाचं नाव ... आहे

     या दिवशी महाराष्ट्रातील लोक आपल्या घरच्या प्रवेशद्वारावर गुढी उभी करतात. ही गुढी जास्त करून बांबूपासून तयार करण्यात येते. काठी स्वच्छ धुवून काठीच्या टोकाला तांबडे किंवा रेशमी वस्त्र बांधतात. काठीला कडुलिंबाची छोटी फांदी, आंब्याचा टाळ, फुलांचा हार, साखरेचे गाठी बांधून शेवटी तांबा-पितळाचा भांडा ठेवून गुढी उभारली जाते. ही गुढी विजय आणि समृद्धीचा प्रतिक मानले जाते. गुढीपाडवा हा वेदांग ज्योतिष यात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही काम सुरू करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते.  आणि म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नविन व्यवसाय प्रारंभ, सोनं खरेदी, नविन वाहन खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश व इतर दक्षिण राज्यांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस उगादी अशा वेगळ्या नावाने- पद्धतीने साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या