इंडिया पोस्ट पेमेंट बँक | India Post Payment Bank (IPPB)

IPPB काय आहे ?
इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. टपाल खात्यातर्फे ही सेवा चालवली जाते. याची सुरुवात १ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. धन अंतरण (मनी ट्रांसफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा,  आदी सुविधा या बँकेतर्फे देण्यात येणार आहे. IPPB ॲप द्वारे हा अकाउंट ॲक्सेस करता येतो.

भारत देशातील सुमारे ६५० शाखा व ३२५० ॲक्सेस पॉइंट्स यांच्या माध्यमातून या बँकेचे कामकाज प्रथम चरणात सुरू झाले. या बँकेत खाते उघडण्यासाठी जवळील पोस्ट ऑफीसला भेट द्या. अकाउंट उघडण्यासाठी ईकेवायसी या प्रक्रियेचा अवलंब केला जाऊ शकतो. या खात्यातील रक्कमेची महत्तम धारण क्षमता रु.१,००,०००/- इतकी आहे. व १,००,००० वरील रक्कम तुमच्या पोस्ट सेव्हींग अकाउंट (POSA पोस्ट सेव्हींग अकाउंट) मध्ये जमा होते. (टीप : पोस्ट सेव्हींग अकाउंट IPPB अकाउंट सोबत लिंक असणे आवश्यक आहे)


IPPB Account vs POSA Account (post office saving account)
 इंडिया पोस्ट पेमेंट बँक व पोस्ट सेव्हींग अकाउंट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
     POSA Account: पोस्ट सेव्हींग अकाउंट सोबत आपल्याला पासबुक मिळतो तसेच आपण नविन एटीएम कार्ड साठी विनंती करू शकतो. म्हणजेच पोस्ट सेव्हींग अकाउंट बरोबर एटीएम कार्ड व नेटबॅंकींग सुविधा मिळते. वार्षिक व्याज ४%. पोस्ट सेव्हींग अकाउंटला १००००० मर्यादा नाही तुम्ही कितीही रक्कम जमा ठेऊ शकता.
     IPPB Account: इंडिया पोस्ट पेमेंट बँक अकाउंट सोबत आपल्याला पासबुक मिळत नाही कारण हा एक डिजिटल अकाउंट असतो. तसेच एटीएम ही मिळत नाही एटीएम च्या बदली (QR Card) क्यूआर कार्ड मिळतो. Qr Card एटीएम मशीन मध्ये चालत नाही 😂☹️ वार्षिक व्याज ४%. IPPB खात्यात १००००० पेक्षा जास्त रक्कम ठेऊ शकत नाही.Cheque Book Request: IPPB ॲप द्वारे आपण घरबसल्या नविन चेकबुक साठी विनंती करू शकतो किंवा कॅन्सल करू शकतो. तसेच आपण आपल्या चेेकची स्थिती/ 
 स्टेटस पाहु शकतो
POSB Sweep In/Out: या पर्यायाचा वापर करून आपण पोस्ट सेव्हींग अकाउंट मधून IPPB अकाउंट मध्ये पैसे जमा तसेच याउलट ippb मधून posa पोस्ट सेव्हींग अकाउंट मध्ये पैसे जमा करू शकतो. हा पर्याय आपण तेव्हाच वापरू शकतो जेव्हा आपलं POSA पोस्ट सेव्हींग अकाउंट IPPB सोबत लिंक असेल. 
UPI ID: होय, ippb मध्ये आपल्याला एक UPI ID मिळतो. पण त्या ID चा वापर फक्त पैसे भरण्यासाठी होतो. UPI to UPI पैसे पाठऊ शकत नाही. हा आयडी आपला मोबाईल नंबर + 01@Ippb असा असतो. म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक 9999999999 आहे तर, तुमचा UPI ID 9999999999+0@ippb म्हणजे 999999999901@ippb असा असेल.

Fund Transferफंड ट्रान्सफर पर्यायाने आपण कोणत्याही बॅंकेत किंवा दुसऱ्या ippb ग्राहकाला पैसे पाठऊ शकतो. त्यासाठी त्याचा बॅंक अकाउंट नंबर व आयएफसी नंबरची आवश्यकता लागते.

Recharge Option:
IPPB ॲप द्वारे आपण बिल भरणा करू शकतो. मोबाईल रिचार्ज, पोस्टपेड बिल, लाईट बिल, डीशटीव्ही, ब्रॉडबँड, एलपीजी व इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत.IPPB Miss Call Banking:


  • IPPB मिसकॉल बॅंकिंग चालू करण्यासाठी तुमच्या रजिस्टर नंबर वरून 8424054994 ला कॉल करा.
  • IPPB अकाउंट शिल्लक जाणून घेण्यासाठी 8424046556 ला मिसकॉल द्या.
  • मिनी स्टेटमेंट साठी 8424026886 वर मिसकॉल द्या.
IPPB SMS Banking :


  • मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी एसएमएस टाईप करा REGISTER आणि 7738062873 ला पाठवा.
  • एसएमएस ने शिल्लक जाणून घेण्यासाठी BAL असा मेसेज 7738062873 ला पाठवा.
  • मिनी स्टेटमेंट साठी MINI असा मेसेज टाईप करुन 7738062873 ला पाठवा.
IPPB QR Card vs Post office ATM card

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या