Voter ID Card ऑनलाईन कसा काय अपडेट करायचा ?

Voter ID Card तुम्ही ऑनलाइन कसं काय अपडेट करू शकता ?

मतदार ओळखपत्रात बर्‍याचदा चुका होतात आणि त्या कारणामुळे त्याला ओळखपत्र म्हणून वापरण्यास काही ठिकाणी अडचण येते. अशीच एक चूक म्हणजे कार्डवरील नाव त्रुटी. आपल्या ओळखपत्रात नाव बदलण्यासाठी किंवा दुरुस्त करण्याचे दोन्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्ग आहेत. आपण आपल्या मतदार ओळखपत्रातील नाव ऑफलाइन मार्गाने बदलू इच्छित असल्यास आपल्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यास आपल्या नावाच्या पुराव्यासह अर्ज द्या. त्यानंतर पडताळणीनंतर आपले नाव मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये आपल्या सर्व तपशीलांसह दुरुस्त केले जाईल आणि नवीन मतदार कार्ड आपल्या घरच्या पत्त्यावर येईल. आपण आपल्या मतदार ओळखपत्रातील नाव /पत्ता/ जन्म दिनांक/ फोटो ऑनलाईन बदलायचे असल्यास, खालील चरणांचे अनुसरण करू शकता.

१. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला https://www.nvsp.in/ वर भेट द्या.

२. मुख्यपृष्ठावरील 'मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करणे / मतदार यादीतील नोंदी सुधारणे' या पर्यायावर क्लिक करा.

३ आता 'Form 8' 'हा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. आपण फॉर्मची भाषा बदलू इच्छित असल्यास आपल्याला ती उजव्या बाजूला बदलण्याचा पर्याय देखील मिळेल.

४. या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती भरा. * * केलेल्या बॉक्स मध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे.


NVSP Website
५. तेथे एक बॉक्स असेल ज्यामध्ये आपल्याला जी माहिती सुधारायची आहे त्या बॉक्स ला टिक करावे लागेल.

६. कागदपत्र म्हणून पॅनकार्ड / आधार / ड्रायव्हींग लायसन्स / स्वत: फोटो यांच्या स्कॅन कागदपत्र अपलोड करा , नंतर ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
आणि शेवटी कॅप्चा कोड प्रविष्ट करा व सबमिट करा. , आपल्या स्क्रीनवर एक संदर्भ क्रमांक दिसेल. याची नोंद घ्या. या क्रमांकासह आपण आपल्या मतदान ओळखपत्राची अपडेट स्थिती तपासू शकता. आपल्या अर्जावर प्रक्रिया होण्यासाठी ८ ते १० दिवस लागू शकतात [ जास्त महिने सुद्धा लागु शकतात 😂/ सरकारी काम आणि महिनाभर थांब..]
     हीच प्रक्रिया आता मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे. मी स्वतः माझ्या कार्डची अपडेट रिक्वेस्ट पाठवली होती आणि ती स्विकारली गेली आहे. खालील स्क्रीनशॉट बघा 🤓


Voter Helpline Android App Official Link


हे पण पहा :
नविन Voter ID Card  ऑनलाइन कसं काय बनऊ शकता ?

१. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला https://www.nvsp.in/ वर भेट द्या. त्यानंतर नविन मतदाता/New Enrollment पर्याय निवडा. Form 6 फॉर्म ६ उघडेल त्यात दिलेल्या सर्व बॉक्स मध्ये आवश्यक माहीती भरा. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून फॉर्म सबमिट करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या