vodafone-idea प्रीपेड युजर्सना मिळेल या तीन प्लान मध्ये डबल डाटा | Vodafone-idea prepaid user get double data on selected 3 plan

vodafone-idea च्या २४९रूपये, ३९९रूपये, आणि ५९९रूपये प्रीपेड प्लानमध्ये अमर्यादित लोकल व नॅशनल वॉईस कॉल सुविधा व दररोज १०० एसएमएस फ्री मिळतात.
# ठळक मुद्दे

  • vodafone-idea प्रीपेड युजर्सना २४९₹, ३९९₹ आणि ५९९₹  या तीन प्लान मध्ये मिळेल डबल डाटा

  •  या तिन्ही प्लानमध्ये पुर्वी १.५जीबी डाटा मिळायच

  •  नविन डबल डाटा ऑफरमध्ये युजर्सना १.५जीबी अतिरिक्त डाटा मिळेल.


Vodafone-idea यांनी प्रीपेड युजर्ससाठी एक नव ऑफर आणलं आहे ज्यामध्ये युजरला १.५जीबी दररोज डबल डाटाचा लाभ मिळेल. ही ऑफर तीन प्लानसाठी मर्यादित आहे ज्यामध्ये २४९रूपये, ३९९रूपये आणि ५९९रूपये प्रीपेड प्लानचा समावेश होतो. हे तिन्ही प्लान vodafone आणि idea या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये आतापर्यंत ग्राहकांना १.५जीबी डाटा मिळत होता आणि आता डबल डाटा ऑफरमुळे त्यामध्ये अधिक १.५जीबी डाटा मिळेल.
     नवीन ऑफर सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे. Vodafone-idea यांच्या वेबसाईट लिस्टिंग प्रमाणे ग्राहकांना आता २४९₹, ३९९₹ आणि ५९९रूपये प्रीपेड रिचार्ज प्लानवर १.५जीबी अधिक डाटाचा फायदा मिळेल.
My idea Android app


 प्रीपेड युजर्सना मिळेल या तीन प्लान मध्ये डबल डाटा | Vodafone-idea 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या