NEFT म्हणजे काय ?

NEFT म्हणजे काय ?

NEFT [National Electronic Fund Transfer] म्हणजे एका बॅंकेतील खात्यातून दुसऱ्या बॅंकेतील खात्यात पैसे पाठवण्याचा मार्ग आहे. याची देखरेख RBI [Reserve Bank of India] करते. NEFT ची सुरुवात नोव्हेंबर २००५ पासून झाली आहे. NEFT‌ ने पैसे पाठवल्यावर पैसे लगेच ट्रान्सफर होत नाही, या सेवेमध्ये प्रत्येक तासाचा स्लॉट असतो आणि त्यानुसार पैसे ट्रान्स्फर होतात. NEFT ने पैसे पाठवण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग व ऑफलाईन बॅंकिंग ( बॅंकेत जाऊन रोख रक्कम किंवा चेक आणि DD ) चा वापर करु शकतो. NEFT करून तुम्ही कितीही पैसा पाठवू शकता त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही पण, रोख रक्कम भरून पैसे पाठवण्यासाठी जास्तीत जास्त ५० हजार रोख रुपयांची मर्यादा आहे. (मोठी देवान-घेवान करण्यासाठी चेक,डीडी, इंटरनेट नेट बँकिंगचा वापर होतो.) पैसे पाठवण्यासाठी कमीतकमी पैशांची गरज नसते तुम्ही कितीही रक्कम ( १ रुपया सुद्धा) पाठऊ शकता.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या