बटाटा पुरी मराठी पाककृती

बटाटा पुरी


साहित्य :
  1. ३-४ मध्यम आकाराचे बटाटे
  2. एक वाटी ज्वारीचे पीठ
  3. एक वाटी कणीक
  4. अर्धी वाटी बेसन
  5. दोन चमचे तांदळाची पिठी
  6. मिठ चवीनुसार
  7. चिमूटभर हळद
  8. एक छोटा चमचा लाल तिखट पावडर
  9. एक चमचा जिरे पूड
  10. एक चमचा तीळ, एक छोटा चमचा ओवा, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा आलं-लसून-हिरवी मिरची पेस्ट, पाव वाटी दही

कृती :

     प्रेशरकुकर मधुन बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे काढल्यावर ते सोलून त्यांचा लगदा करून घ्या ( किंवा कीसून घ्या). एका परातीत हा बटाट्याचा लगदा किंवा कीस घेऊन त्यात कणिक, ज्वारीचे पीठ, बेसन, तांदळाची पिठी, हळद, लाल तिखट पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, जिरे पूड, तीळ, ओवा, दही घालावे व लागेल तसे पाणी घालून पुर्यांसाठी घट्ट पीठ मळून घ्या. तेलाचे मोहन घालून पुन्हा मळून घ्या. १५-२० मिनिटे ओल्या सुती कपड्याने झाकून बाजूला ठेवावे. १५ मिनिटांनी कपडा काढून पुन्हा एकदा पीठाला तेलाचा हात लावून कणीक मळतो तसे मळून घ्या. परातीला पीठ चिकटता कामा नये.
     या मळून घेतलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून घ्यावेत. एकेक गोळा लाटून बेताच्या आकाराच्या पुर्या  लाटून तळावे व आपल्याला आवडत्या लोणचे किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या