कढई पनीर पाककृती मराठीत

कढई पनीर


साहित्य:

 1. ३०० ग्रॅम पनीर
 2. मोठी शिमला मिरची
 3. १ मोठा कांदा
 4. १ टोमॅटो
 5. आलं लसूण पेस्ट
 6. १ मोठा चमचा धने
 7. ३-४ लाल मिरच्या
 8. १ चमचा गरम मसाला
 9. २ चमचे तेल
 10. कसुरी मेथी
 11. मीठ
कृती:
     पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून घ्या. आणि शिमला मिरची उभी चिरून घ्या, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. धने आणि लाल मिरच्या एकत्र करून मिक्सरमधून कोरडं दळून घ्या. कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर कांदा परतून घ्यावा नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. मग टोमॅटो घालून दोन मिनिटे परतावे आणि मग त्यावर कोरडा कढई मसाला घाला. हे संपूर्ण मिश्रण गोळा होऊन त्यातून तेल सुटेपर्यंत परतावे, त्यात अंदाजे पाणी घालून शिमला मिरची अर्धवट शिजू द्या. नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून वरून गरम मसाला घाला. चवीनुसार मीठ घालून नीट ढवळून घ्या आणि १० मिनिटे शिजू द्या. वरून कसुरी मेथी चुरून घाला. (लिंबू पिळून सर्व्ह करा )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या